सजलेली रात माझी फुलतोरणाची
अमृताच्या गोडव्याची ओथंबली रती
साही ऋतुंचा सोहळा थाटला दारात
क्षितिजाच्या कडा चिंब झाल्या गुलालात
येग येग सये, अशी नजिक पहा ना
आभाळीचा चंद्र घरी येणार पाहुणा
-ना. धों. महानोर
जन्मापासूनचे दुःख
जन्मापासूनचे दुःख जन्मभर असे
जन्मभर राहो, मला त्याचे न फारसे
सर्वांसाठी झाले उभ्या देहाचे सरण
सगे सोयरेही कधी जातात दुरून.
फुले वेचताना सुध्दा ओथंबते मन
जन्माचेच ओझे पोटी घट्ट लपेटून
-डोळे गच्च अंधारून.तेव्हा माझे रान-
रानातली झाडे मला फुले अंथरूण.
-ना.धों. महानोर
जन्मभर राहो, मला त्याचे न फारसे
सर्वांसाठी झाले उभ्या देहाचे सरण
सगे सोयरेही कधी जातात दुरून.
फुले वेचताना सुध्दा ओथंबते मन
जन्माचेच ओझे पोटी घट्ट लपेटून
-डोळे गच्च अंधारून.तेव्हा माझे रान-
रानातली झाडे मला फुले अंथरूण.
-ना.धों. महानोर
Subscribe to:
Posts (Atom)

